38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeफ्रान्सवरून ४ राफेल विमाने वायुसेनेत दाखल होणार

फ्रान्सवरून ४ राफेल विमाने वायुसेनेत दाखल होणार

एकमत ऑनलाईन

चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय वायूसेनेची ताकद अधिक वाढणार

नवी दिल्ली: फ्रान्सहून चार राफेल लढाऊ विमाने जुलैपासून भारतात येण्यास सुरूवात होईल. यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय वायूसेनेची ताकद अधिक वाढणार आहे. लढाऊ विमाने मेच्या अखेरपर्यंत भारतात दाखल होणार होती. मात्र सध्या भारत आणि फ्रान्स दोनही देश कोरोनाविरोधात लढा देत आहेत त्यामुळे लढाऊ विमाने भारतात पोहोचण्यास उशीर होत आहे. ही चारही विमाने पंजाबच्या अंबाला एअरबेसवर उतरतील.

पहिल्या लढाऊ विमानाच्या उड्डाणाची तयारी
एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही चारही लढाऊ विमानांपैकी तीन विमाने ही दोन सीटस असणारी ट्रेनर विमाने असतील तर एक लढाऊ विमान एक सीट असलेले विमान असेल. ही चारही विमाने जुलैच्या अखेरीस अंबाला एअरबेसवर पोहोचण्यास सुरूवात होईल. ही लढाऊ विमाने आरबी सीरिजची असतील. सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या लढाऊ विमानाच्या उड्डाणाची तयारी करण्यात आली आहे. पहिले विमान फ्रान्सच्या पायलटसोबत १७ गोल्डन एरोजचे कमांडिग आॅफिसर उडवतील.

Read More  लॉकडाऊनमध्ये भांडी विक्री करणा-यावर गुन्हा दाखल

लढाऊ विमानांमध्ये टँकर एअरक्राफ्टने हवेत इंधन भरले जाईल्
सूत्रांच्या मते भारताच्या दिशेने येणाºया या लढाऊ विमानांमध्ये टँकर एअरक्राफ्टने हवेत इंधन भरले जाईल. यानंतर हे विमान मध्य पूर्व येथील एखाद्या ठिकाणी उतरवले जाईल. यानंतर हे विमान मध्य पूर्व येथून भारताच्या दिशेने उड्डाण करेल. सूत्रांनी पुढे सांगितले की राफेलच एकाच वेळेस सरळ भारतात पोहोचू शकते मात्र १० तासांच्या प्रवासात छोट्याशा कॉकपिटमध्ये पायलटना बसून राहणे त्रासदायक ठरू शकते.

ताकद पाकिस्तान आणि चीनच्या तुलनेत अधिक वाढणार
राफेल लढाऊ विमाने उडवण्यासाठी लागणारे ट्रेनिंग भारताच्या सात पायलटनी पूर्ण केले आहे. दोन्ही देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर भारतीय पायलटची दुसरी टीम ट्रेनिंगसाठी फ्रान्सला रवाना होणार आहे. भारताने ३६ राफेल विमानांसाठी सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्ससोबत ६० हजार कोटी रूपयांचा करार केला होता. हा करार दोन्ही सरकारदरम्यान झाला होता. राफेल लढाऊ विमाने भारताच्या ताफ्यात आल्यानंतर भारतीय वायुसेनेची ताकद पाकिस्तान आणि चीनच्या तुलनेत अधिक वाढणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या