22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रआता सरकार कोणाला तोंड दाखवेल : नाना पटोले

आता सरकार कोणाला तोंड दाखवेल : नाना पटोले

एकमत ऑनलाईन

सांगली : सांगलीत चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.

दरम्यान, या घटनेचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, राज्यात आता कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. साधूंवर अशा प्रकारे अन्याय होत असेल, तर आता हे (सरकार) कोणाला तोंड दाखवेल, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. राज्यात मलाईचे खाते घेण्यासाठी चढाओढ सुरू असून राज्याला अद्याप पालकमंत्री दिले गेले नाहीत.

 

या सरकारला कुठलीही काळजी नाही. त्यांना (एकनाथ शिंदे) मोदी-शहांचे हस्तक बनायला आवडते आणि राज्यातील जनतेला वा-यावर सोडायला, असे सांगत पटोलेंनी सांगलीत झालेल्या घटनेचा काँग्रेसतर्फे निषेध नोंदवला.

दरम्यान, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील ४ साधूंना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला.

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावक-यांना चारही साधूंना मारहाण केली.
मुले पळवणारी चोरांची टोळी समजून गैरसमजुतीतून चारही साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना जत तालुक्यातील लवंगा येथे घडली आहे. उमदी पोलिसांकडून तातडीने कारवाई करून नागरिकांच्या तावडीतून साधूंना सोडवले गेले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत असणा-या जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना गाडीतून ओढून पट्ट्याने, काठीने मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली आहे. यावेळी आम्ही साधू असल्याचे वारंवार चौघांकडून सांगितले जात होते. पण संतप्त जमावाने त्यांचे काहीही न ऐकून घेता मारहाण सुरूच ठेवली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत रात्री पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या