22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रगुवाहाटीतून ४० आमदारांचे मुडदे येतील : संजय राऊत

गुवाहाटीतून ४० आमदारांचे मुडदे येतील : संजय राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. गुलाब पाटलांची भाषण पाहिली तर शिवसेनेत हाच असं दिसला. तुझ्या मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत म्हणाले की, संदीपान भुमरे हा वॉचमेन होता, त्याला मुंबई माहिती नव्हती. हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता. आज त्याला मंत्री बनवले. शिवसेनेमुळे मी मंत्री झालो असे अश्रू उद्धव ठाकरे आणि माझ्यासमोर म्हटलं. हे अश्रू मगरीचे होते. गुवाहाटीचे हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर. महाराष्ट्रात खरा बिग बॉस हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. प्रकाश सुर्वे भाजी विकत होता त्याला पुन्हा भाजी विकायला लावू असंही त्यांनी सांगितले.

तसेच मी हे संकट मानत नाही. शिवसेना ताकदीने पुढे नेऊ. यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावं लागेल. प्रकाश सुर्वे पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवले आहेत. बळी द्या असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या