22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयदेशात २४ तासांत ४२५७ नवीन कोरोना रुग्ण

देशात २४ तासांत ४२५७ नवीन कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात पुन्हा कोरोनाची भीती वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत ४२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा ८ मार्चनंतरचा उच्चांक आहे. तेव्हा ४५७५ केसेस होत्या. या महिन्यात ही दुसरी वेळ आहे जेव्हा नवीन बाधितांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी २ जून रोजी देशातील ४०४१ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

शनिवारी, १५ संक्रमित लोकांचा मृत्यू झाला, तर २६१२ बरे झाले. सध्या २२,६९१ जणांवर उपचार सुरू आहेत. महामारीच्या या काळात देशात ४.३१ कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४.२६कोटी बरे झाले तर ५.२४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये प्रत्येक १०० चाचण्यांमागे १० संक्रमित
केरळमध्ये संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे आहेत. येथे शनिवारी १४६५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 7 रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६६७ रुग्ण बरे झाले. सध्या ७४२७ सक्रिय प्रकरणे आहेत, म्हणजेच इतक्या बाधितांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह दर ९.८७ % आहे, म्हणजे प्रत्येक १०० चाचण्यांमध्ये सुमारे १० लोक पॉझिटिव्ह येत आहेत.

महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे
देशात कोरोना रुग्णांच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा संसर्गाचा वेग वाढला आहे. येथे शनिवारी १३५७ नवीन रुग्ण आढळले तर ५९५ बरे झाले आणि एका संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला. आता येथे ५८८८ सक्रिय प्रकरणे आहेत. वाढत्या केसेस पाहता राज्यात पुन्हा एकदा मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या