नवी दिल्ली : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. भारतात कोरोना संसर्गात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४,५१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारी आकड्यांच्या माहितीनुसार देशात एकुण अॅक्टिव्ह रुग्णांची संध्या २५,७८२ इतकी आहे. तर गेल्या २४ तासांत २,७७९ जणांची पकृती बरी झाली असून आत्तापर्यंत ४२,६३०,८५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात कोरोनाची चौथी लाट येण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. दिल्लीत रविवारी १.९१ टक्के पॉझिटिव्ह दरासह ३४३ नवीन कोरोना प्रकरणं नोंदवली गेली आहेत. कर्नाटकात रविवारी ३०१ नवीन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १ हजार ४९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी ६१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ३८ हजार ५६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ % एवढे झाले आहे.
राज्यात आज १४९४ नवीन रुग्णांचे निदान झालेय. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार ७६७ इतकी झाली आहे.