27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमराठवाडाएसटी बस-पिकअप अपघातात ५ ठार

एसटी बस-पिकअप अपघातात ५ ठार

एकमत ऑनलाईन

औरंगाबादजवळील दुर्घटना, ३ जण गंभीर जखमी
करमाड : भरधाव बोलेरो पिकअपचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पिकअप टेम्पो दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने जाणा-या एसटी बसवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. २५)सायंकाळी साडेसहा वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव शिवारातील हॉटेल स्वराज मराठा हॉटेल समोर घडली.

एसटी महामंडळाची पुणे-कळमनुरी बस (क्र. एम. एच.१३ सीयू ६८३८) ही औरंगाबादहून-जालनाकडे जात होती, तर बोलेरो पिकअप टेम्पो (क्र. एम. एच.२१ बीएच ४३३१) ही जालन्याहून औरंगाबादकडे येत होता. गाढेजळगाव शिवारातील हॉटेल स्वराज मराठा समोर दोन्ही वाहने येताच बोलेरो पिकअप टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यावेळी टेम्पो दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणा-या बसवर जाऊन आदळला. यावेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. तरीही भरधाव वेगात असलेला टेम्पो बसला जाऊन धडकला. यावेळी झालेल्या भीषण अपघातात टेम्पोचा चुराडा झाला. ही धडक ऐवढी जोराची होती की, पिकअप टेम्पो पूर्णपणे कापला गेला. यामध्ये जवळपास आठ प्रवासी होते. ते सर्व कामगार असून ते कामावरून औरंगाबाद येथे परतत होते.

अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पोऊनि.दादासाहेब बनसोडे, प्रेम म्हस्के, चालक शत्रुघ्न मडावी, नारायण भिसे, सुनील गोरे, संतोष पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला घेत महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांनी भेट देऊन सूचना दिल्या.

मृतांची नावे
भीषण अपघात ५ जण जागीच ठार झाले असून, अशोक चव्हाण (४५), पारुबाई जाधव (४०), शांतीलाल चव्हाण (५०), रणजित चव्हाण (३८, सर्व रा. सातारा तांडा, औरंगाबाद), लहू ज्योतिराम राठोड (५५, रा. रेणुकानगर, बीड बायपास, औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या