23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रअजित पवार, जयंत पाटलांसह ५ आमदारांचे मतदान बाकी

अजित पवार, जयंत पाटलांसह ५ आमदारांचे मतदान बाकी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असंच चित्र दिसत आहे.

विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे –
भाजपा – राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
शिवसेना – आमश्या पाडवी, सचिन अहिर
राष्ट्रवादी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस – चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
काँग्रेसच्या वीस आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल. तर, राष्ट्रवादीच्या ५ आमदारांचे मतदान अद्याप बाकी. अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप मोहिते, माणिक कोकाटे यांचे मतदान बाकी.

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. रुग्णवाहिकेमार्फत त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहे. कर्करोगाशी सामना करत असताना त्यांनी मतदान करण्यााचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या मतदानावेळीही त्यांनी उपस्थिती लावली होती.

भाजपाच्या ५० आमदारांनी मतदान केलं आहे. आत्तापर्यंत ६८ जणांचं मतदान पूर्ण झालं आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले. मतदान बाकी असलेले आमदार – धनंजय मुंडे, सरोज अहिरे, निलेश लंके, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते, छगन भुजबळ, सुमन पाटील, अशोक पवार

१५ आमदारांनी नोंदवली मतं
मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या १५ मिनिटांत १५ आमदारांनी आपली मते नोंदवली आहेत. हरिभाऊ बागडे यांनी सर्वात आधी मतदान केलं आहे.तर आत्तापर्यंत भाजपाच्या आठ आमदारांनी मतदान केलं आहे. अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमर राजूरकर हे काँग्रेसचे पोलिंग एजंट आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या