18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात ५ नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात ५ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज ५ नवे रुग्ण सापडले, तर ७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४३९ एवढा झाला आहे. आज २५९ जणांची आरटीपीसीआर, तर ३७३ जणांची रॅपिड अ­ँटिजन टेस्ट करण्यात आली.

त्यात आरटीपीसीआरमधील ४, तर रॅपिड अ­ँटिजन टेस्टमधील १ असे एकूण ५ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९२ हजार ४४३ झाली असून, त्यापैकी ८९ हजार ९६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या