23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home महाराष्ट्र 5 कामगारांचा मृत्यू : नागपूरच्या ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात स्फोट

5 कामगारांचा मृत्यू : नागपूरच्या ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात स्फोट

नागपूर : नागपूरमधील मानस ऍग्रोमध्ये बायोडायजेस्टरमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्वीच्या पूर्ती साखर कारखान्याचे नाव आता मानस ऍग्रो आहे. हा कारखाना नागपूर जिल्ह्यातील बेला गावाजवळ हा कारखाना आहे. मानस ऍग्रोमध्ये बायोडायजेस्टरचे वेल्डिंग सुरू होते. ते ज्या कंपनीला काम दिले होते त्याचे लोक तिथे आता काम करत होते. वेल्डिंगचे काम करत असताना तिथे स्फोट झाला आणि वेल्डर्सपैकी 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मंगेश प्रभाकर नौकरकर (वय 21), लीलाधर वामनराव शेंडे (वय 47), वासुदेव विठ्ठल लडी (वय 30), सचिन प्रकाश वाघमारे (वय 24) आणि प्रफुल्ल पांडुरंग मुन (वय 25) अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व वडगाव येथील रहिवाशी आहेत.

मृतांचे नातेवाईक आणि गावातील लोक घटनास्थळी गोळा झाले आहेत. मृतदेश घेण्यास नातेवाईक आणि गावकऱ्यांनी नकार दिला आहे. मॅनेजमेंटमधून कोणीतरी यावे मगच मृतदेह ताब्यात घेऊ अशी मागणी ते करत आहेत. नागपूरचे पोलील अधीक्षक राकेश ओला आणि उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow