प्योंगयांग : उत्तर कोरियामध्ये पालकांनी हॉलिवूड चित्रपट किंवा मालिका पाहिल्यास त्यांना तुरुंगात टाकले जाऊ शकते. हॉलिवूड किंवा दक्षिण कोरियातील कोणताही चित्रपट पाहिल्यास मुलांना ५ वर्षांची शिक्षा आणि त्यांच्या पालकांना ६ महिन्यांची मजुरी करावी लागेल.
प्योंगयांगमधील बैठकीदरम्यान नवीन कायद्याची घोषणा करताना, पालकांनी आपली मुले वेळोवेळी काय पाहत आहेत याची काळजी घ्यावी, असे म्हटले होते. जर पालकांनी मुलांचे घरी चांगले संगोपन केले नाही तर ते भांडवलशाहीचे गुणगान करत मोठे होतील आणि समाजविरोधी बनतील, असेही त्यांचे मत आहे.
दक्षिण कोरियातील नाटक आणि संगीताची वाढती लोकप्रियता पाहण्यासाठी उत्तर कोरियाने २०२० मध्ये एक कायदा केला होता. या कायद्यानुसार वैचारिक आणि सांस्कृतिक साधनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विदेशी माहिती आणि त्याच्या प्रभावावर बंदी घालण्यात आली.

उत्तर कोरियामध्ये नवीन कायद्याबाबत इशारा जारी
नवीन कायद्यानुसार, जर कोणी आपल्या मुलांना परदेशी चित्रपट किंवा शो पाहण्याची परवानगी दिली तर त्यांना कठोर शिक्षा होईल, असा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत मुलांच्या पालकांना इशारे देऊन सोडून दिले जात होते, मात्र नवीन कायद्यात पहिल्या गुन्ह्यासाठीही मुलावर आणि पालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हा इशारा केवळ चित्रपटांपुरता मर्यादित नाही. उत्तर कोरियामध्ये, जर कोणी परदेशी विशेषत: दक्षिण कोरियातील पारंपरिक नृत्य करताना, गाताना किंवा बोलताना आढळले तर त्याला आणि त्याच्या पालकांना ६ महिन्यांची शिक्षा होईल.