23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeराष्ट्रीयमुलगी झाली म्हणून फ्रीमध्ये ५० हजार लोकांना वाटली 'पाणीपुरी'

मुलगी झाली म्हणून फ्रीमध्ये ५० हजार लोकांना वाटली ‘पाणीपुरी’

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एका कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंद अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. घरी ‘नन्ही परी’ आल्याच्या आनंदात एका व्यक्तीने फ्रीमध्ये तब्बल ५० हजार लोकांना ‘पाणी पुरी’ वाटल्याची घटना समोर आली आहे. एका पाणीपुरी विक्रेत्याने मुलींना एक ओझं समजणा-यांना मोठा संदेश दिला आहे. कोलर परिसरात राहणारे अंचल गुप्ता यांनी मुलगी झाली म्हणून दुपारी १ ते संध्याकाळी ६ पर्यंत दुकानात आलेल्या सर्व ग्राहकांना मोफत पाणीपुरी दिली आहे. त्यांनी तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी दिली.

कोलार परिसरात त्यांनी लोकांना मोफत पाणीपुरी देण्यासाठी पाणीपुरीचे अनेक स्टॉल लावले होते. अंचल गुप्ता यांनी मला मुलगी झाली आहे. मी देवाकडे प्रार्थना केली होती की माझ्या घरी मुलीचा जन्म व्हावा आणि देवाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. मुलीच्या जन्माआधी मी म्हटलं होतं की, माझ्या घरी मुलगी झाली तर मी एक दिवस पाणीपुरीचा फ्री स्टॉल ठेवेन. आता माझ्या घरी मुलगी आली आहे. त्यामुळे हा मोफत स्टॉल ठेवला असून लोक हवं तेवढी पाणीपुरी खाऊ शकतात असं म्हटलं आहे.

मुलीच्या जन्माचा अनोख्या पद्धतीने साजरा केलेला हा आनंद पाहून लोकही यात सहभागी झाले. तसेच यांचं भरभरून कौतुकही केले जात आहे. मोफत पाणीपुरी मिळणा-या या स्टॉलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोठ्या उत्साहात या कुटुंबाने मुलगी घरी येण्याचा आनंद साजरा केला आहे. व्हायरल होणा-या या व्हिडीओच्या आधारे अनेक लोकांनी अंचल गुप्ता यांच्या मुलीला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचे ब्रँड अँबेसडर करा अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देखील टॅग केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या