19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयपहिल्या टप्प्यासाठी बसपाचे ५३ उमेदवार निश्चित

पहिल्या टप्प्यासाठी बसपाचे ५३ उमेदवार निश्चित

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. बहुजन समाज पक्षाने पहिल्या टप्प्यात ५८ पैकी ५३ जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. बीएसपी सुप्रीमो मायावती यांनी वाढदिवसानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. इतर पाच जागांचाही निर्णय दोन ते तीन दिवसांत होईल, असेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ साठी पहिल्या टप्प्यातील ५८ पैकी ५३ जागांनी मायावती यांनी उमेदवार निश्चित केले आहेत.

माझ्याविरोधात मीडियाला कोणताही मुद्दा मिळत नाही. त्यामुळे ते रोज माझ्या निवडणुका लढवल्याचा मुद्दा उपस्थित करीत आहेत, असे स्वत: विधानसभा निवडणूक लढवल्याच्या वृत्तावर मायावती यांनी सडेतोड उत्तर दिले. मी चारवेळा लोकसभा आणि तीनवेळा राज्यसभेची सदस्य राहिली आहे. पक्षाच्या हितासाठी थेट निवडणूक लढविण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना विजयी करण्यासाठी काम करणार आहे. आपल्या राज्यघटनेत अशी तरतूद आहे की, निवडणूक न लढवताही स्वत:च्या गुणवत्तेवर कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री होता येते, असेही मायावती म्हणाल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या