24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयऑफिसच्या कपाटात सापडले ५५० कोटींचे घबाड

ऑफिसच्या कपाटात सापडले ५५० कोटींचे घबाड

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : येथील एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी तिथला प्रकार पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले, कारण कार्यालयात चक्क ५५० कोटी सापडले.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, आयकर विभागाने ६ ऑक्टोबर रोजी हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर नुकतीच छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिका-यांना एका कपाटात तब्बल १४२ कोटी रुपये सापडले आहेत. इतर गोष्टी मिळून आतापर्यंत सुमारे ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे.

आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तके आणि रोख रक्कम मिळून आली. डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे या छापेमारीच जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारीवेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर, जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. त्यात कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन, याचा समावेश आहे. अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडले आहेत, त्यापैकी १६ लॉकर चालवले जात आहेत. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या