कोची: वृत्तसंस्था
लॉकडाउनमुळे मालदीवमध्ये अडकून पडलेल्या ५८८ भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. भारतीय नौदलाच्या समुद्रसेतू या मोहिमेद्वारे आयएनएस जलाश्व या नौकेतून त्यांना कोचीच्या किना-यावर रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आणले गेले. नौदलाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.
Read More नियमाचे उल्लंघन करणा-यांना दिल्ली पोलिसांनी शिकवला धडा
द कोची पोर्ट ट्रस्टने याबाबत ट्वीट केले असून, मायदेशी परतलेल्या भारतीयांचा फोटोदेखील त्याला जोडला आहे. परतलेल्यांमध्ये ५६८ नागरिक केरळचे रहिवासी असून, १५ जण तमिळनाडू, तीन तेलंगण आणि दोघे लक्षद्वीपचे असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. वंदे भारत मोहिमेच्या तिस-या टप्प्यात ही प्रक्रिया पार पडली. या आधी १० मेला मालदीवहून ६९८ भारतीयांना परत आणण्यात आले होते. तर, दोनच दिवसांपूर्वी आयएनएस मगर या नौकेतून २०२ भारतीय मायदेशी परतले होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय उच्चायोगाने मालदीव सरकारचे नागरिकांच्या सुरक्षित पाठवणीबद्दल आभार मानले असून, त्यांना धन्यवाद दिले आहेत.