लातूर : मुंबई, पुणे, हैदराबादसह इतर गावांहून येणाºया नागरिकांमुळे लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे़ आतापर्यंत ३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे मात्र लातूरकरांना दिलासादायक बाब म्हणजे आजपर्यंत तब्बल ५९ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत़ बाहेर जिल्ह्यातून येणा-या नागरिकांमुळे ही संख्या वाढत आहे़ जिल्ह्यात सर्वप्रथम निलंगा शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते़ त्यानंतर काही दिवस कोरोना रुग्ण आढळून आले नाहीत़ लातूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असतानाच जिल्ह्यात हळूहळू कोरोनाने आपले पाय पसरले़ लातूर तालुका, रेणापूर तालुका, अहमदपूर तालुका, जळकोट तालुका, निलंगा तालुक्यातील गावांमधून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत गेली़ शहरासह जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, व्यापारी संस्थाने, आस्थापना सुरू करण्यात आले आहेत़ बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत़ त्यातच उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे; परंतु बाजारपेठेतील गर्दीमुळे भीतीदायक चित्र वाटत आहे़ या गर्दीवर अजूनही पूर्णत: नियंत्रण मिळवता आलेले नाही.
लातूरकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आजपर्यंत तब्बल ५९ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत़ दि़ २७ मे रोजी ८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले़ त्यामध्ये निलंगा तालुक्यातील कोराळी येथील ६ जण, जळकोट तालुक्यातील गव्हाण येथील एक जण आणि उदगीर येथील एकाचा समावेश होता़ २८ मे रोजीही एका रुग्णास सोडण्यात आले़ २९ मे रोजी ३ जणांना, ३० मे रोजी १३ जणांना, ३१ मे रोजी ४ जणांना, १ जून रोजी १, ५ जून रोजी ११ जणांना, ६ जून रोजी १२ जणांना सोडण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
Read More खते आणि बियाणांचा काळाबाजार केल्यास कडक कारवाई – कृषिमंत्री दादाजी भुसे