हिंगोली/प्रतिनिधी
हिंगोलीत दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज ५ जून रोजी शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात नव्या सहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३१ वर गेली आहे. तर आतापर्यंत तब्बल १६१ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहे.
शुक्रवारी आलेल्या अहवालात हिंगोली पासून जवळच असलेल्या आंधारवाडी येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये भरती असलेल्या ६ जणांना कोरोना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये २८ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. रिसाला बाजार येथील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील हे दोघे आहेत. तर तिसरा व्यक्ती व त्यांचे कुटुंब पुण्यावरून शहरातील नगर परिषद कॉलनी येथे आले आहे.
सदर व्यक्ती ३३ वर्षीय असून कोरणा पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर तिघेजण एकाच कुटुंबातील असून हे तिघेही मुंबईवरून हिंगोली येथे आले आहेत़ यामध्ये २७ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष व ९ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. दरम्यान रिसाला बाजार येथील एकाच कुटुंबातील तिघांना व मुंबई येथून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना अशा वेगळ्या दोन कुटुंबातील प्रत्येकी तीन सदस्यांना कोरोनाची लागत झाली आहे.
Read More वेदनादायी घटना : आईचा मृत्यू, सात दिवसाचं बाळ आईविना पोरकं
जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या १९२ वर पोहोचली आहे. तर १६१ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आहे. सद्या कोरोना बाधित ३१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. वसमत येथे १४ व हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये १७ रुग्ण दाखल आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. हिंगोली जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सामाजिक अंतर, मास्क वापरणे, सैनिटायझरचा वापर आदी बाबी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये : जिल्हाधिकारी
लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आली असली तरी नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये विशेषत: १० वर्षा खालील मुले तसेच ५५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांनी कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. या सोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, -हदयविकास असलेल्या रुग्णांनीही घराबाहेर पडणे टाळावे. या सोबतच इतर नागरीकांनीही आवश्कयता असेल तरच घराबाहेर पडावे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले़