कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. अशातच गृहमंत्रालयाने कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. तर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत दोषी असणा-या काल दगडफेक करणा-या आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणा-या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती केसरकर यांनी सांगितलं आहे.
तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंर्त्यांनी सांगितले आहेत. तर कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालाआहे. औरंगजेबाच्या समर्थनाचा स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणावरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर जमावाने सुमारे तीन तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली.‘जय श्रीराम’चा नारा देत या घटनेतील संशयितावर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केलं. संतप्त जमावातील काही तरुणांनी या परिसरातील दुकाने बंद पाड