24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत गोदामाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू

दिल्लीत गोदामाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील अलीपूर येथील एका भागात गोदामाची भिंत कोसळली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत भिंतीखाली दबून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार गोदामामध्ये २० ते २५ कामगार करत होते.

दरम्यान, अलीपूर भागात भिंत कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने बचावकार्य सुरु केले आहे. आतापर्यंत या दुर्घटनेतील १० जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती आहे. या घटनेतील जखमी कामगारांना उपचारासाठी दिल्लीतील हरीशचंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु अजून काहीजण या भिंतींच्या ढिगा-याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तक्रार मिळूनही प्रशासनाने अवैध गोदामाचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

भिंतीखाली आणखी १० जण अडकले असल्याची शक्यता आहे. ढिगा-याखाली अडकलेल्या १० जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी भिंतीच्या ढिगा-याखाली दबून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. जखमींपैकी २ जण गंभीर जखमी आहेत. कामगारांना वाचविण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या