औरंगाबादेत 60 नवे रुग्ण; कोरोनाबधितांची संख्या 1179 वर

333

औरंगाबाद: औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा नवे 54 आणि सायंकाळी 6 असे एकूण 60 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या 1179 वर पोहोचली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शहरातील गरमपाणी येथील 1, शिवराज कॉलनी येथील 1, कैलास नगर येथील 1, सौदा कॉलनी येथील 1, रेहमानिया कॉलनी येथील 2, आझम कॉलनी, रोशन गेट येथील 2, सिटी चौक येथील 6, मकसूद कॉलनी येथील 1, हडको एन-12 येथील 1, जयभीम नगर येथील 11, हुसेन कॉलनी, गल्ली नं.9 येथील 1, खडकेश्वर येथील 1, न्याय नगर, गल्ली न.18 येथील 2, हर्सुल कारागृह येथील 1, खिवंसरा पार्क,उल्कानगरी येथील 2, टाइम्स कॉलनी, कटकट गेट येथील 2, मुकुंदवाडी येथील 5, आदर्श कॉलनी येथील 1, काबरा नगर येथील 1, गुरुगोविंदसिंगपूरा येथील 3, हुसेन कॉलनी, गल्ली नं.10 येथील 4 आणि पडेगाव येथील मीरा नगर भागातील 4 जणांचा समावेश आहे. गुरुवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये 28 महिला आणि 26 पुरुषांचा समावेश आहे. यानंतर पुन्हा वाढलेल्या 6 जणांमध्ये मकसूद कॉलनी येथील 1, सिडको एन-5 येथील 1, सिडको एन-7 येथील 1, पिसादेवी येथील 1, राम नगर भागातील 1 आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

Read More  करोनामुळे ठप्प झालेल्या मुंबईला एका बुस्टर डोसची गरज-जितेंद्र आव्हाड

कोरोनाचे आणखी 3 बळी; मृतांची संख्या 42 वर
शहरात सकाळपासून 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. शहरात10 मे पासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असून ही संख्या आता 42 वर पोहोचली आहे. गुरुवारी पहिला मृत्यू असेफिया कॉलनी येथील 48 वर्षे पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास 19 रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान त्याचा लाळेचा नमुना दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आला. त्यादरम्यान बुधवारी सकाळी 10.30च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संध्याकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. या रुग्णाचा बायलॅटरल न्यूमोनायटीस, हायपरटेन्शन विथ कोविड या आजाराने मृत्यू झाला. दुसरा मृत्यू रहेमानिया कॉलनी येथील 65 वर्षीय रुग्णाचा झाला. हा रुग्ण 19 रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी 11.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याला हायपरटेन्शन तसेच कोरोनाचा संसर्ग असल्याचे निदान बुधवारी सायंकाळी 5.30 वाजता झाल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. तर तिसरा मृत्यू खडकेश्वर येथील यशोमंगल सोसायटीतील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास 18 रोजी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. तसेच पूर्वी त्याची प्लास्टी झालेली होती. त्यामुळे तो उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्याचा गुरुवारी सकाळी 11 वाजता बायलेटरल कोविड या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.