27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीय600 विदेशी कंपन्या चीनमधून भारतात येण्याची शक्यता, सरकारची चर्चा सुरू

600 विदेशी कंपन्या चीनमधून भारतात येण्याची शक्यता, सरकारची चर्चा सुरू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे (आता चीनमधून बाहेर पडणाऱ्या 600 विदेशी कंपन्या भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांनुसार या कंपन्यांबरोबर सध्या चर्चा सुरू आहे. या योजनेसंदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सर्व राज्यांशी संपर्क देखील केला आहे. जे राज्य काही सवलतीच्या स्तरावर आणि कमी वेळामध्ये प्लांट सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध करून देईल त्याठिकाणी विदेशी कंपन्यांना जाण्यासंदर्भात सूट दिली जाणार आहे. याकरता राज्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. एका मुलाखतीमध्ये उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, विदेशी कंपन्यांना देशामध्ये आणण्यासाठी राज्यांची भूमिका महत्त्वाची असेल. राज्यांमध्ये विदेशी कंपन्या त्या त्या राज्यात याव्यात यासाठी स्पर्धा व्हावी असा सरकारचा प्रयत्न असेल असही ते म्हणाले.

Read More  पार्टीत होते 9 कोरोना पॉझिटिव्ह : वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांवर गुन्हा

आता विदेशी कंपन्यांना एखाद्या ठिकाणी यूनिट सुरू करण्यात मुख्यत: जमीन मिळवणे आणि स्थानिक स्तरांवर मंजूरी मिळण्यात सर्वाधिक समस्या येते. अशावेळी राज्यांना तयार केले जात आहे की ते सर्वाधिक जमीन उपलब्ध करू शकतील. विदेशी कंपन्यांना भारतामध्ये जमीन अधीग्रहण करण्याबाबत अनेक भ्रम आहेत, ते दूर करणे आवश्यक असल्याचं गोयल म्हणाले. कोरोनाचे संकट असूनही भारतात गुंतवणूक वाढत आहे, हा एक चांगला संकेत आहे.

गोयल पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे अनेक समस्यांना जरी तोंड द्यावे लागले असले, तरीही काही संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. उद्योग जगताबरोबर मिळून सरकार पुढील आराखडा तयार करत आहे. वेगवेगळ्या उद्योंगांसाठी वेगवेगळा आराखडा तयार करण्यात येणार आहे.ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने कृषी, खाणकाम आणि उद्योग क्षेत्रामध्ये बरेच बदल घडवून आणले आहेत. कॉर्पोरेट टॅक्समध्ये देखील मोठी कपात केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या