27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात २३७ दिवसांत ६२६ शेतक-यांची आत्महत्या

मराठवाड्यात २३७ दिवसांत ६२६ शेतक-यांची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

बीड : मराठवाड्यातील शेतक-यांचे आत्महत्येचे भीषण वास्तव समोर आलं आहे. कारण १ जानेवारी ते २५ ऑगस्ट या २३७ दिवसांत मराठवाड्यातील एकुण ६२६ शेतक-यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणा-या सर्वाधिक शेतक-यांची संख्या बीड जिल्ह्यातील आहे. एकट्या बीड जिल्ह्यात २३७ दिवसांत १७० शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

बीड जिल्ह्यानंतर सर्वाधिक शेतक-यांचीआत्महत्या केलेल्या जिल्ह्यात औरंगाबादचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २३७ दिवसांत १०९ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे याच औरंगाबाद जिल्ह्यात पाच मंत्री आहेत. ज्यात केंद्राचे अर्थ राज्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि राज्याचे कृषी, सहकार, रोजगार व फलोत्पादन मंत्री यांचा समावेश आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची संख्या आता यापुढे तरी कमी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

जुलै महिन्यानंतर ऑगस्टमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात मराठवाड्याच्या दौ-यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. तसेच लवकरच नुकसान भरपाई मिळण्याचे आश्वासनही दिले होते.

मात्र त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी झाल्याने नुकसानग्रस्त भागाची संख्या वाढली आहे. तसेच नुकसानभरपाई सुद्धा अजून शेतक-यांच्या खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे १२ सप्टेंबरला औरंगाबाद दौ-यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतक-यांसाठी काय घोषणा करणार याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या