24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeदेशात चोवीस तासांत ६,५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू

देशात चोवीस तासांत ६,५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
देशातील कोरोना रुग्णांची सख्या दीड लाखांहून अधिक झाली आहे. दिवसागणिक कोरोनाचा विळखा आधिक घट्ट होत चालला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ५८ हजार ३३३ इतकी झाली असून, ६७ हजार ६९२ रुग्ण बरे झाले आहेत. ४ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ६ हजार ५६६ नवे रुग्ण आढळले असून १९४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात ८६ हजार ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते आता ४२.४ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरातील २१३ देशात कोरोना व्हायरस या महामारीने विळखा घातला आहे. जगात आतापर्यंत ५७ लाख ८९ हजार ८४३ जणांना संसर्ग झाला आहे. तर तीन लाख ५७ हजार ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत २४ लाख ९७ हजार ६१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Read More  टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शिक्कामोर्तब; वेळापत्रक जाहीर

भारतात जुलैच्या सुमारास कोरोना विषाणूची शिखरावस्था गाठली जाऊन मृतांची संख्या १८ हजारापर्यंत जाऊ शकते, असे साथरोग व सार्वजनिक आरोग्य तज्ञ तसेच सेंटर फॉर कंट्रोल आॅफ क्रोनिक कंडिशन्स या संस्थेचे संचालक प्रा. डी. प्रभाकरन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अजूनही कोरोनाची साथ चढत्या क्रमाने पुढे जात आहे. प्रभाकरन हे लंडन स्कूल आॅफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेतही प्राध्यापक आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील कोरोनाची साथ जुलैत शिखरावस्थेत राहील व तेव्हा भारतातील बळींची संख्या १८ हजार असू शकते. सध्या जी वेगवेगळी प्रारूपे सादर करण्यात आली आहे़ त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतात रुग्णांची संख्या चार ते सहा लाख राहील़ त्यात मृत्युदर तीन टक्के राहील.

तर, देशात १८ हजार बळी
भारतात जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोविड-१९च्या रुग्णांमध्ये वाढ होऊन कोरोनाबळींची संख्या १८ हजारांपर्यंत पोहोचू शकते, अशी भीती साथरोगतज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतात या साथीच्या रोगाचा आलेख चढताच आहे, असे कंट्रोल आॅफ क्रोनिक कंडिशन्स संस्थेच्या संचालकांनी म्हटले आहे. अन्य देशांमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या चढत्या-उतरत्या आलेखाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याअनुषंगाने भारतात चार ते सहा लाख कोरोनारुग्ण आढळून येतील आणि मृत्यूदर तीन टक्के असेल. म्हणजेच ही संख्या १६ हजार ते १८ हजारांपर्यंत पोहोचेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या