22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्र७/११ मुंबई बॉम्बस्फोटाच्या सुनावणीला ६ महिने लागतील

७/११ मुंबई बॉम्बस्फोटाच्या सुनावणीला ६ महिने लागतील

एकमत ऑनलाईन

मुंबई : ७/११ बॉम्बस्फोटातील खटल्यात फाशीची शिक्षा सुनावलेल्या पाच आरोपींच्या सुनावणीसाठी आता स्वतंत्र खंडपीठ नियुक्त करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सोळा वर्षे उलटूनही अद्याप बॉम्बस्फोटातील पीडितांना न्यायाची प्रतीक्षा कायम राहिली आहे.

यासंदर्भात आज या सुनावणीत हजारो कागदपत्रे आणि पुरावे दाखल असून सुनावणी पूर्ण होण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागतील असे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे न्या. आर. डी. धनुका आणि एम. जी. न्या. सेवलीकर यांच्या खंडपीठाने यासाठी स्वतंत्र खंडपीठ नियुक्त करण्याचे निर्देश दिले. आजच ७/११ बॉम्बस्फोटाला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा कनिष्ठ न्यायालयाने निकाल देऊनही सात वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र याप्रकरणी पाच दोषसिद्ध आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी आले, तेव्हाही कामाचा ताण अधिक असल्याने ही सुनावणी पूर्ण करण्यासाठी पाच ते सहा महिने लागणार असल्याने न्यायालयाने त्याच्या सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी प्रकरण ऑगस्टमध्ये ठेवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या