27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीय७ भारतीय येमेनच्या ताब्यात

७ भारतीय येमेनच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

दुबई : संयुक्त अरब अमिरातचे एक जहाज रवाबीवर स्वार असलेल्या चालक दलाच्या ७ भारतीय सदस्यांना येमेनमध्ये सक्रीय असलेल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत भारताने संयुक्त राष्ट्राकडे मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, रवाबी जहाजावर तैनात असलेल्या चालक दलाच्या सदस्यांशी आपले बोलणे झाल्याचे युनायटेड नेशन्सने सांगितले आहे.

संबंधित जहाजात प्राणघातक शस्त्रे आढळून आली तसेच, ते लाल सागरातून ताब्यात घेण्यात आल्याचे हुती बंडखोरांनी म्हटले आहे. भारतीय चालक दलाला ओलीस ठेवल्याबद्दल संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस त्रिमूर्ती यांनीही चिंता व्यक्त केली. आम्ही हुती बंडखोरांना चालक दलाच्या सदस्यांची आणि जहाजाची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या