22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील ६ राज्यांवर ७५ हजार कोटींची वीज थकबाकी

देशातील ६ राज्यांवर ७५ हजार कोटींची वीज थकबाकी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वीजनिर्मिती कंपन्या आणि कोळसा कंपन्यांची थकबाकी असलेल्या ६ राज्यांना इशारा दिला आहे. या राज्यांच्या वीज कंपन्यांकडे सर्वाधिक थकबाकी आहे, अशा सहा राज्यांच्या मुख्य सचिवांना केंद्रीय ऊर्जा सचिवांनी पत्र लिहिले आहे. पत्रात ऊर्जा सचिवांनी या राज्यांना वीज निर्मिती कंपन्यांची थकबाकी लवकरात लवकर भरण्यास सांगितले आहे.

परतफेड न केल्यास वीजपुरवठा खंडित होईल
देशातील ६ राज्यांना वीज निर्मिती कंपन्यांची थकबाकी लवकरात लवकर भरण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास या राज्यांच्या वीजपुरवठ्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असे ऊर्जा सचिवांनी सांगितले. ऊर्जा सचिवांच्या मते, वीज कंपन्या आणि कोळसा कंपन्यांची थकबाकी भरण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

तामिळनाडूचे कर्ज सर्वाधिक
या सहा राज्यांची एकूण थकबाकी सुमारे ७५००० कोटी रुपये आहे, ज्यामध्ये तामिळनाडूची सर्वात जास्त थकबाकी आहे. राज्याकडे वीज निर्मिती कंपन्यांचे २०,८४२ कोटी रुपये तर कोल इंडिया लिमिटेडचे ​​७२९ कोटी रुपये आहेत.

महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर
यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राकडे वीज निर्मिती कंपन्यांचे १८,०१४ कोटी रुपये आणि कोल इंडिया लिमिटेडचे ​​२५७३ कोटी रुपये आहेत.

‘या’ राज्यांकडेही थकबाकी
राजस्थान सरकारकडे वीज कंपन्यांचे ११,१७६ कोटी रुपये आणि कोळसा कंपनीचे ३०७ कोटी रुपये थकीत आहेत. उत्तर प्रदेशचे वीज कंपन्यांचे ९३७२ कोटी रुपये आणि कोळसा कंपन्यांचे ३१९ कोटी रुपये आहेत. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरकडे ७,२७५ कोटी रुपये आणि मध्य प्रदेशकडे ५०३० कोटी रुपये थकीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या