24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयनववर्षात पाच महिन्यांत ७६ अतिरेक्यांचा खात्मा

नववर्षात पाच महिन्यांत ७६ अतिरेक्यांचा खात्मा

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : काश्मिरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ब-याच प्रमाणात शांतता सुरु झाली आहे. मात्र हे भारताचा शेजारी पाकिस्तानला आवडले नसल्याने त्याने सीमेपलीकडून अतिरेक्यांना भारतात पाठवणे सुरुच ठेवले आहे. मात्र त्यातही सुरक्षा दलांंकडून त्याला चांगलाच दणका दिला आहे. वर्ष २०२२ च्या पाच महिन्यात आतापर्यंत सुरक्षा दलांच्या अतिरेक्यांबरोबर ५० चकमकी झाल्या असून त्यात ७६ अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. मृत अतिरेक्यांमध्ये २६ पाकिस्तानी अतिरेकी असून ५० काश्मिरी आहेत.

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरमध्ये शांतता वाढली असून खो-यातील तरुणांनाही रोजगारांची उपलब्धता वाढू लागली आहे. परिणामी तरुणांमध्ये अतिरेकी होण्याचा कल घटल्याचे दिसून आल्याचे जम्मू-काश्मिरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले. यावर्षी आतापर्यंत ठार झालेले १२ अतिरेकी लष्कर-ए-तोयबा व १४ जैश-ए-मोहंमदचे होते, असेही त्यांनी सांगितले. एका वरिष्ठ लष्करी अधिका-याने दिलेल्या माहितीनूसार स्थानिक तरुणांनी शस्त्रे उचलण्यास नकार दिल्याने पाकिस्तानी अतिरेकी बिळातून बाहेर येत आहेत. काश्मीरच्या स्थितीवर नजर ठेवणा-या संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने धोरण बदलले आहे. ते आता ड्रोनच्या माध्यमातून छोटी शस्त्रे पाठवत आहेत आणि सॉफ्ट टारगेटवर (नागरिक) हल्ला करण्यासाठी ओव्हर ग्राउंड वर्कर्सचा वापर करत आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये श्रीनगरला दहशतवादमुक्त जाहीर केले होते.

पाकिस्तानी अतिरेक्यांच्या संख्येत वाढ
काश्मिरी तरुणांचा प्रतिसाद मिळत नसल्याच्े पाहिल्यानंतर पाकिस्तानकडून पाकिस्तानी अतिरेक्यांची घुसखोरी वाढवली आहे. सुरक्षा दलांनी या वर्षी सुरुवातीच्या ५ महिन्यांत केलेल्या चकमकीत २६ पाकिस्तानी अतिरेकी मरणे हे त्याचेच द्योतक आहे. २०२१ मधील १२ महिन्यांत एकूण २० पाकिस्तानी अतिरेकी मारले गेले होते. २०२० मध्ये जम्मू-काश्मिरात २१५ अतिरेकी मारले गेले. त्यात ३२ पाकिस्तानी होते. ते सीमा ओलांडून आले होते. त्यामानाने यंदा केवळ ५ महिन्यात २६ पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा होणे हे त्याचेच द्योतक आहे, असेही विजय कुमार सांगतात.

गेल्या २४ तासांत ६ अतिरेकी ठार
दक्षिण काश्मिरात दोन वेगवेगळया चकमकीत एकूण ६ अतिरेकी ठार झाले. यात २ पाकिस्तानी होते. ३ मीरहामा आणि ३ अनंतनागमध्ये ठार झाले. यात एक पोलिसही शहीद झाला. तर तीन सैनिक जखमी झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या