25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रमेटेंच्या अपघाताचा तपास करण्यासाठी पोलिसांची ८ पथके नियुक्त

मेटेंच्या अपघाताचा तपास करण्यासाठी पोलिसांची ८ पथके नियुक्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला.

या अपघातात मेटेंच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मेटेंचा अपघात नेमका कसा आणि कोणामुळे झाला याबाबत पोलिसांचे ८ पथक तपास करत आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.

एका मोठ्या ट्रकने विनायक मोटेंच्या गाडीला पाठीमागून धडक दिली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अपघातानंतर ट्रक निघून गेला. सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम करण्यात येत असून तपासानंतर सगळ्या गोष्टी समोर येतील, असेही दुधे म्हणाले.

गाडीचा चालक पोलिसांच्या ताब्यात
विनायक मेटे यांचा आज सकाळी अपघाती मृत्यू झाला. या अपघाताची आता चौकशी होणार आहे. यासाठी मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचीही चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी एकूण आठ पथकं तयार करण्यात आली आहे. फॉरेन्सिकची टीमही यामध्ये असणार आहे.

पहाटे पाच वाजून ५ मिनिटांनी विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. यावेळी आपल्याला जवळपास एक तास मदत मिळाली नसल्याचा आरोप गाडीच्या चालकाने केला आहे. प्रथमदर्शनी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मेटेंच्या गाडीचा डावा भाग पूर्णत: चिरडला गेला आहे. या अपघातात मेटेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा अंगरक्षकही गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या