27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रदावोस परिषदेत ८० हजार कोटींचे गुंतवणूक करार

दावोस परिषदेत ८० हजार कोटींचे गुंतवणूक करार

एकमत ऑनलाईन

आर्थिक परिषदेत महाराष्ट्राची सरस कामगिरी
दावोस : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिस-या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. आज ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने तीन दिवसांत सुमारे ८० हजार कोटींचे करार पूर्ण झाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. गेल्या तीन दिवसांमध्ये ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार पूर्ण करत महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.

ऊर्जा निर्मितीसाठी ५० हजार कोटी गुंतवणूक करण्यासाठी रि न्यू पॉवर कंपनीने राज्य शासनासोबत करार केला. कंपनीचे संचालक सुमंत सिन्हा उपस्थित होते. याद्वारे राज्यात १० ते १२ हजार मेगावॅट ऊर्जा निर्माण होणार आहे. याशिवाय आज इंडोनेशियाच्या एशिया पल्प अँड पेपर कंपनीने रायगड जिल्ह्यात सुमारे १.५ बिलियन यूएसडी गुंतवणुकीसाठी करार केला. याशिवाय वेदांता ग्रुपचे संचालक अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणा-या बॅटरीसंबंधी अमरा राजा ग्रुपचे संचालक जय गल्ला यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये आणि मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्री सादर करण्यासाठी बायजूस यांच्या सोबत सामंजस्य करार केला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल, सचिव (शालेय शिक्षण) रणजितसिंग देओल व बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन व दिव्या रवींद्रन उपस्थित होते. शिवाय राज्याने जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिलसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, राज्याला शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अति. मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे सीईओ डॉ पी. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर आणि महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घोरपडे या सोहळ््यात स्वाक्षरी करणा-या कंपन्यांच्या उद्योग प्रतिनिधींसह उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या