24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात दिवसभरात ८२९६ रुग्ण, १७९ मृत्यू

राज्यात दिवसभरात ८२९६ रुग्ण, १७९ मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाचे दिवसभरात महाराष्ट्रात ८ हजार २९६ रुग्ण आढळले आणि १७९ मृत्यू झाले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ६ हजार २६ जण दिवसभरात बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९६.०५ टक्के, मृत्यूदर २.०४ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १४.०४ टक्के आहे.

राज्यात आतापर्यंत झालेल्या ४ कोटी ३८ लाख १३९ चाचण्यांपैकी ६१ लाख ४९ हजार २६४ पॉझिटिव्ह आल्या. कोरोनामुळे राज्यात ५ लाख ८५ हजार ५८० होम क्वारंटाइन तर ४ हजार ७३७ संस्थात क्वारंटाइनमध्ये आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ६१ लाख ४९ हजार २६४ कोरोनाबाधीत झाले. यापैकी ५९ लाख ६ हजार ४६६ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख २५ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांपैकी ३ हजार २७० जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने सांगितले. सध्या महाराष्ट्रात १ लाख १४ हजार कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

काँग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन, बैलगाडी मोडल्याने भाजपची टोलेबाजी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या