24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील ८६ टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा

देशातील ८६ टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात पुढील सहा महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करीत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणा-या कर्मचा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ८६ टक्के कर्मचारी पुढील सहा महिन्यांत नोकरीचा राजीनामा देऊ इच्छित आहेत, असे रिक्रूटमेंट एजन्सी मायकल पेजच्या अहवालातून समोर आले आहे. कर्मचारी चांगल्या पगारासाठी व वर्क लाईफ बॅलन्ससाठी नोकरी सोडण्यास तयार असतात.

अहवालानुसार, ६१ टक्के कर्मचारी असे आहेत ज्यांना कामाच्या आयुष्यात संतुलन राखण्यासाठी नोकरीचा राजीनामा द्यायचा आहे. कोरोना महामारीनंतर नोकरीचा राजीनामा देणा-या कर्मचा-यांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत त्याला आणखी वेग येईल. मोठ्या संख्येने कर्मचा-यांनी नोकरी सोडल्याचा परिणाम सर्व प्रकारच्या बाजारपेठा आणि उद्योगांमध्ये दिसून येईल.

कमी पगार कारणीभूत
कमी पगार, करिअरच्या भूमिकेत किंवा उद्योगातील बदल आणि कंपनीच्या दिशानिर्देशावर नाराज असल्यामुळे बहुतेक कर्मचारी राजीनामा देत आहेत. १२ देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय कर्मचारी नोकरी सोडण्यात आघाडीवर आहेत. भारतातील बहुतेक कर्मचारी सहा महिन्यांत नोकरी सोडण्याचा विचार करीत आहेत. यानंतर इंडोनेशिया, फिलीपिन्स, मलेशिया, थायलंड आणि आग्नेय आशियाचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, खासगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी नोकरी सोडण्यास अधिक इच्छुक आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या