नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 2,350 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे, आतापर्यंत कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 39,174 इतकी झाली आहे. म्हणजेच, सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के इतका आहे. देशात सध्या कोविड-19 चे 58,802 सक्रीय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या एकूण रूग्णांपैकी सुमारे 2.9% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.
प्रती लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात मृत्यूसंख्या 0.2 इतकी आहे. तर जगभरातल्या लोकसंख्येचा विचार करता, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 4.1 मृत्यू इतके आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवाल क्रमांक 119 मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत, सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांची यादी खालीलप्रमाणे आहे.
देश | एकूण मृत्यू | प्रती लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण |
जग | 3,11,847 | 4.1 |
अमेरिका | 87180 | 26.6 |
इंग्लंड | 34636 | 52.1 |
इटली | 31908 | 52.8 |
फ्रांस | 28059 | 41.9 |
सेप्न | 27650 | 59.2 |
ब्राझील | 15633 | 7.5 |
बेल्जियम | 9052 | 79.3 |
जर्मनी | 7935 | 9.6 |
ईराण | 6988 | 8.5 |
कॅनडा | 5702 | 15.4 |
नेदरलँड्स | 5680 | 33.0 |
मेक्सिको | 5045 | 4.0 |
चीन | 4645 | 0.3 |
तुर्कस्थान | 4140 | 5.0 |
स्वीडन | 3679 | 36.1 |
भारत | 3163* | 0.2 |
एकूण संसर्गाच्या तुलनेत कमी असलेला मृत्यूदर, वेळेत रुग्ण ओळखून त्यांच्यावर झालेल्या योग्य उपचारांचे निदर्शक आहे.
चाचण्या
देशभरात काल विक्रमी 1,08,2 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण 24,25,742 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
भारतात जानेवारी महिन्यात कोविड-19 ची चाचणी केवळ एकाच प्रयोगशाळेत होत होती, आता मात्र आपण अत्यंत जलद गतीने आपल्या चाचणी क्षमतेत वाढ केली असून सध्या देशात 385 सरकारी तर 158 खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांची सुविधा आहे. सर्व केंद्रीय सरकारी प्रयोगशाळा, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी क्षेत्रे या सर्व ठिकाणची चाचणी क्षमता वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय, चाचण्यांना गती देण्यासाठी TrueNAT आणि CBNAAT या आणखी दोन चाचणी किट्स विकसित करण्यात आल्या आहेत.
एम्ससारख्या 14 अग्रणी वैद्यकीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील प्रयोगशाळांना पुरेशी जैव-सुरक्षा प्रमाणके आणि अधिस्वीकृती करण्यात मदत करण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमध्ये चाचणीची साधने सतत उपलब्ध राहावीत यासाठी साहित्याचे वाटप करण्याच्या दृष्टीने, भारतीय टपाल आणि खाजगी संस्थांच्या मदतीने 15 डेपो विकसित करण्यात आले आहेत. आधी चाचण्यांची साधने आपण आयात करत होतो, आता मात्र अनेक भारतीय कंपन्यांना ही साधने बनविण्यासाठी पाठबळ दिले जात आहे, यामुळे चाचणीची पुरेशी साधने देशात उपलब्ध आहेत.