27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रपुणे जिल्ह्यात ९ जण बुडाले

पुणे जिल्ह्यात ९ जण बुडाले

एकमत ऑनलाईन

भाटघर धरणात ५ महिला, तर खेड तालुक्यात ४ मुलांचा मृत्यू
मृतांमध्ये चार बहिणींचा समावेश
पुणे : जिल्ह्यातील भाटघर धरणात पाच महिला, तर खेड तालुक्यातील चासकमान धरणात पोहोयला गेलेले ४ विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्यू पावले. ही घटना गुरुवारी घडली. भाटघर धरणातील बुडालेल्या पाच महिलांपैकी चौघींचे मृतदेह सापडले असून, एका महिलेचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. भाटघरमध्ये बुडालेल्यांमध्ये चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.

भोर तालुक्यातील न-हे गावातील भाटघर जलाशयात गुरुवारी दुपारी १२ वाजता पोहोण्यासाठी उतरलेल्या पाच विवाहित महिला बुडाल्या. त्यातील चार महिलांचे मृतदेह सापडले. बुडालेल्यांमध्ये चार बहिणींचा समावेश आहे. त्यात तीन बहिणी आणि त्यांच्या वहिनींचा मृतदेह सापडला. खुशबू लंकेश रजपूत (१९, बावधन, पुणे), मनिषा लखन रजपूत (२०), चांदनी शक्ती रजपूत (२१), पूनम संदीप रजपूत (२२, तिघी संतोषनगर, हडपसर) आणि मोनिका रोहित चव्हाण (२३, रा. न-हे) अशी त्यांची नावे आहेत. यातील मनिषा रजपूतचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

४ शाळकरी मुलांचा
खेड तालुक्यात मृत्यू
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चासकमान धरण परीसरातील बुरसेवाडी हद्दीत कृष्णमूर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूलची सहल आली होती. चार मुले चासकमान धरणात बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० च्यादरम्यान घडली. या दुर्घटनेत दोन मुले आणि दोन मुली मृत झाल्या आहेत. परीक्षित आगरवाल, तनिषा देसाई, ऋचा दीदी आणि नव्या भोसले अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या