27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानात बॉम्बस्फोटात ९ ठार

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटात ९ ठार

एकमत ऑनलाईन

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० पेक्षा जास्तजण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानातील अतंर्गत कामकाजमंत्री मसूद अंदाराबी यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या बॉम्बस्फोटाच ९ जण ठार झाले असून २० पेक्षा जास्तजण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून नाकाबंदी करण्यात आली आहे. परिसरात बचावकार्य सुरू आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे. तसेच सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीमही हाती घेतली आहे. काबूलमध्ये गेल्या मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोट आणि गोळीबारात उपप्रांतीय गव्हर्नरसह तीनजणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानात हिंसाचाराचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. तालिबान आणि सरकारमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी काही ठोस उपाययोजनांसाठी आणि सामजस्यांबाबत चर्चा सुरू असतानाच हिंसाचाराच्या सत्राला सुरुवात झाली आहे.

नेपाळची संसद विसर्जित करा – पंतप्रधान ओलींची शिफारस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या