25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयभीषण अपघातानंतर बस पेटून ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

भीषण अपघातानंतर बस पेटून ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

एकमत ऑनलाईन

गुलबर्गा : गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा येथे अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, हैदराबादचे रहिवासी असलेले अर्जुन कुमार आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी कुटुंबियांसह गोव्यात आले होते.‘ऑरेंज’या या कंपनीच्या बसने ते गोव्याला दोन दिवसांपूर्वी फिरायला आले होते. गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन कुमार आणि त्यांचं कुटुंब शुक्रवारी हैदराबादकडे निघाले होते.

यावेळी गुलबर्गा शहराच्या बाहेरील सोलापूर -हैदराबाद राज्य महामार्गावर कमलापूर गावाजवळ समोरून येणा-या कंटेनरला बसने जोराची धडक दिली. या अपघातात बसने पेट घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली.

बस मधून एकूण २९ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने २० प्रवासी गंभीर जखमी झाले तर नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. जखमींना गुलबर्गा शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बसची आग आटोक्यात आणली. या भीषण अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या