24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeराष्ट्रीयअनियंत्रित ट्रकने ९ जणांना चिरडले, ५ ठार

अनियंत्रित ट्रकने ९ जणांना चिरडले, ५ ठार

एकमत ऑनलाईन

राजस्थानमधील घटना, ४ जण गंभीर जखमी
जोधपूर : राजस्थानच्या पाली येथे रविवारी रात्री उशिरा एका अनियंत्रित ट्रकने देवदर्शनाला जात असलेल्या भाविकांना चिरडले. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जोधपूर येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रकचालक घटनेनंतर पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड सुरू झाली. महामार्गावर जखमींचा आक्रोश सुरू होता. माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना रोहट रुग्णालयात दाखल केले. तेथून प्राथमिक उपचारानंतर त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आले.
पाली जिल्ह्यातील रोहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंदई पुलिया-दलपतगड दरम्यान रामदेवरा येथे भाविकांचा भंडारा कार्यक्रम होता. रात्री एक च्या सुमारास रामदेवरा येथे जात असताना भिलवाडा येथील लोकांचा जमाव येथे थांबला. सर्वजण रस्त्याच्या कडेला बांधलेल्या तंबूकडे जात होते. यादरम्यान भरधाव वेगात आलेला ट्रक लोकांना चिरडत निघून गेला.

यामध्ये भिलवाडा येथील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. ६ जणांना जोधपूरला रेफर करण्यात आले. त्यापैकी २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्वजण पायीच रामदेवराकडे जात होते. अपघाताची माहिती मिळताच सीओ ग्रामीण मंगलेश चुंडावत हेही घटनास्थळी पोहोचले.

जखमींचा मोठा आक्रोश
अपघातानंतर महामार्गावर जखमींचा आक्रोश झाला. तेथून जाणारे वाहनचालक तेथेच थांबले. रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी १०८ चे पायलट शैतान सिंग राजपुरोहित आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या