22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई महामार्गावर ९ वाहने धडकली

मुंबई महामार्गावर ९ वाहने धडकली

एकमत ऑनलाईन

मुंबई : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज विचित्र अपघात घडला आहे. खंडाळा बोरघाटात हा विचित्र अपघात घडला. या घटनेनंतर काही काळ एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प होती. यात जीवित हानी झालेली नाही. मात्र, या अपघातात २ वाहन चालकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. एका मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला. या दरम्यान त्याने अनेक गाड्यांना धडक दिली.

घटनास्थळी बोरघाट वाहतूक पोलिसांनी धाव घेत सर्व अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अलिकडे सातत्याने अपघात होत आहेत. खरे तर वाहनांसाठी स्वतंत्र लेन आहेत. मात्र, एखाद्या वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघात वाढले असून, जीवित हानीही मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात उपाययोजना कराव्या लागणार आहेत, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या