30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home लातूर जिल्ह्यात शनिवारी झाले ९९.१७ टक्के कोविड लसीकरण

लातूर जिल्ह्यात शनिवारी झाले ९९.१७ टक्के कोविड लसीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात दि. १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी संथपणे सुरु असलेल्या लसीकरणाला शनिवार दि. २३ जानेवारी रोजी चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात एकच दिवसांत ९९.१७ टक्के लसीकरण करण्यात आले.

लाभार्थ्यांच्या संख्येनुसार जिल्ह्यात लसीकरणाची योग्य ती तयारी करण्यात आलेली असून दि १६ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील ६ ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले. प्रत्येक संस्थेस प्रती सत्र १०० लाभार्थ्यांचे (हेल्थ केअर वर्कर्स) उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार पहिल्या दिवशी एकूण ६०० लाभार्थ्यांपैकी ३७९ लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण करण्यात आला. याकरिता जिल्ह्यात सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लि. या कंपनीची कोव्हिशिल्ड लस वापरण्यात येत आहे. संपूर्ण लसीकरण मोहीम योग्य रीतीने पार पडावी तसेच जिल्ह्यातील सर्व हेल्थ केअर वर्कर्स (शासकीय व खाजगी संस्थेतील) यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण व्हावे याकरिता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं), जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी तसेच जिल्हास्तरीय नोडल अधिकारी कर्मचारी वरील आरोग्य संस्थांना भेटी देऊन मार्गदर्शन करत आहेत.

दि १६, १९ व २० जानेवारी २०२१ अखेर संस्थानिहाय लसीकरण करण्यात आलेल्या एकूण लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आरोग्य संस्थेचे नाव, दि १६, १९ व २० जानेवारी २०२१ या कालावधीत लसीकरण करण्यात आलेल्या एकूण लाभार्थ्यांची संख्या, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर १६८, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय लातूर- १६८, सामान्य रुग्णालय उदगीर-२२३, ग्रामीण रुग्णालय औसा-१५९, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर-१८७, ग्रामीण रुग्णालय मुरुड-१७२, एकूण-१ हजार ७३ एवढी आहे.

कोविड-१९ प्रतिंधात्मक लसीकरणासाठी लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील एकूण १७३९४ लाभार्थ्यांची (हेल्थ केअर वर्कर्स) माहिती केंद्र शासनाचे पोर्टलवर भरण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सहा आरोग्य संस्थेत हेल्थ केअर वर्कर्सना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. दि. २३ जानेवारी रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर १७०, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय लातूर- ९९, सामान्य रुग्णालय उदगीर-८३, ग्रामीण रुग्णालय औसा-९५, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर-७८, ग्रामीण रुग्णालय मुरुड-७३, एकूण ६०० पैकी ५९५ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

आईच्या निधनानंतर मुलानेही प्राण सोडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या