19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजनभारतीसह पतीविरुद्ध २०० पानांचे आरोपपत्र दाखल

भारतीसह पतीविरुद्ध २०० पानांचे आरोपपत्र दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने आज मोठी कार्यवाही केली आहे.

२०२०मध्ये भारती सिंग हिच्या घरामध्ये एनसीबीने छापा टाकला होता. यामध्ये ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणात त्यांना अटकदेखील करण्यात आलेली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याच प्रकरणी २०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्याने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या