28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयदोन तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाचा व्हॅन-कारच्या अपघातात मृत्यू

दोन तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाचा व्हॅन-कारच्या अपघातात मृत्यू

एकमत ऑनलाईन

बूंदी : राजस्थानात एक भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाचाही समावेश आहे, यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग ५२ वर इटूंदा वळणाजवळ हा अपघात झाला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखाबाई (वय २४) यांची शुक्रवारी डिलिव्हरी झाली आणि त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाला घेऊन त्यांच्या सासू नंदू देवी (वय ५८) आणि पती हंसराज (रा. भीलवाडा) हे एका व्हॅनमधून घरी परतत होते.

देवा खेडा जवळच्या बुंदीपासून जयपूरकडे वेगाने जाणा-या कारने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. यामुळे व्हॅनचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यात व्हॅनचालक पिंटू (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये रेखाबाईल, नंदू देवी आणि नवजात बालकाला देवळी रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

तर रेखाबाई यांचा पती हंसराज यांना गंभीर स्थितीत कोटा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती कळताच मोठ्या संख्येनं लोकांनी देवळी आणि हंडली रुग्णालयात पोहोचले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या