मुंबई : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्या अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम ६-अ मध्ये ६-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यास आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल.
त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या खात्यांचा तात्पुरता कार्यभार नव्या मंत्र्यावर सोपवला आहे.
गुलाबराव पाटील – अनिल परब
एकनाथ शिंदे – सुभाष देसाई
दादा भुसे – शंकरराव गडाख
अब्दुल सत्तार – प्राजक्त तनपुरे
उदय सामंत – आदित्य ठाकरे
राजेंद्र पाटील यड्रावरकर – सुभाष देसाई
बच्चू कडू – आदिती तटकरे