22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रकोरोना काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा दिलेल्या कर्मचा-यांना मोठा दिलासा

कोरोना काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा दिलेल्या कर्मचा-यांना मोठा दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात कोविड काळात काम केलेल्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचा-यांसाठी देखील एक महत्वाचा निर्णय सरकारनं घेतला आहे. नोकरीसाठी लाभ मिळावा म्हणून गुणांकन कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंर्त्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळं राज्यातील हजारो वैद्यकीय कर्मचा-यांना लाभ होणार आहे.

गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचा-यांचा देखील समावेश आहे.

कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचा-यांनी सेवा बजावली आहे. सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचा-यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या