31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeअजस्त्र लाटांमध्ये अडकलं भलं मोठं जहाज

अजस्त्र लाटांमध्ये अडकलं भलं मोठं जहाज

एकमत ऑनलाईन

रत्नागिरी: निसर्ग वादळ जसजसं महाराष्ट्राच्या जवळजवळ येऊ लागलं आहे तसतसं याची तीव्रता देखील वाढू लागली आहे. वाऱ्याच्या वेगामुळे कोकणातील समुद्र प्रचंड खवळला आहे. त्यामुळे उंचच उंच लाटा इथे पाहायला मिळायला मिळत आहे. याच दरम्यान, रत्नागिरी येथील मिऱ्या समुद्रात एक भलं मोठं जहाज अजस्त्र लाटांमध्ये अडकल्याचं दिसून आलं होतं. खरं तर हे जहाज भरकटत इथवर आल्याचं समजतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज सुरुवातीला मिकररवाड बंदरात नेण्याचे प्रयत्न असफल झाले आहेत. या जहाजात काही खलाशी देखील अडकले होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून संपूर्ण दृश्य ही धडकी भरवणारी आहेत. दरम्यान, थोड्या वेळाने हे जहाज पंधरा माड परिसरातील संरक्षक भिंतीवर येऊन धडकलं त्यामुळे जहाजावर अडकलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले. अखेर काही वेळानंतर या जहाजावरील खलाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Read More  ‘भूल भुलैया 2′ लॉकडाऊनमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला; 31 जुलैला होणार प्रदर्शित

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ मुरुड आणि अलिबागदरम्यान धडकण्याची शक्यता आहेत. त्यामुळे या भागातील किनारपट्टीजवळील अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, हे वादळ जेव्हा समुद्रकिनारी धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२० एवढा प्रचंड असणार आहे. म्हणजेच हे वादळ पूर्ण क्षमतेने आणि रौद्र रुप धारण करुन जमिनीच्या दिशेने येत आहे. बऱ्याचदा असंही होतं की, चक्रीवादळ हे किनाऱ्याच्या दिशेने येता-येता काहीसं मंदावतं. त्यामुळे वारे वाहण्याचा वेग देखील कमी होतो. निसर्ग चक्रीवादळाबाबत देखील असंच काहीसं होतं का याकडे हवामान तज्ज्ञांचं सतत लक्ष आहे. मात्र, ताज्या माहितीनुसार, हे वादळ पूर्ण क्षमतेने किनाऱ्यावर धडकून पुढे सरसावणार आहे.

दुसरीकडे या संकटाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफच्या जवानांनी किनारपट्टी जवळ राहणाऱ्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. याशिवाय येथील अनेक ग्रामीण भागातील तरुणांना संकट काळात कशाप्रकारे मदत करायची याचं देखील प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे या वादळाला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या