24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीय३९ जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू

३९ जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ३९ जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला जाणा-या बसला भीषण अपघात झाला आहे. आयटीबीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, त्यामुळे हा अपघात झाला. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते.

अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात ४ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणा-या बसला मोठा अपघात झाला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ३९ जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली असून आतापर्यंत चार जवांनाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंदनवाडीवरुन पहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

बचावकार्य सुरु
अपघात झालेल्या बसमध्ये ३९ जवान होते. ज्यामध्ये आयटीबीचे ३७ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे २ जवानांचा समावेश होता. बसचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली, अशी माहिती मिळत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. या अपघातात मोठ्या संख्यने जवान जखमी होण्याची भीती आहे. बचावकार्य सुरु करण्यात आले असून आतापर्यंत ४ जवांनांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या