23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रताम्हिणी घाटात दरीत कोसळली कार; तिघांचा जागीच मृत्यू

ताम्हिणी घाटात दरीत कोसळली कार; तिघांचा जागीच मृत्यू

एकमत ऑनलाईन

पुणे : माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात शनिवारी रात्री कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार तब्बल १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत तिन्ही प्रवासी वाशिम जिल्ह्यातील आहेत.

जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटन करून परतीच्या वाटेवर असताना माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला आहे. ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. यांचा जागीच मृत्यू झाला असून हे सर्वजण वाशिम जिल्ह्यातील आहेत.

कठड्याला धडकून कार कोसळली दरीत
ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रोशन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवार २० ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास झाला. वाशिमहून तळ कोकणात असलेल्या देवगड याठिकाणी हे पर्यटक जात होते. यावेळी हा भीषण अपघात झाला. त्यांची कार ताम्हिणी घाटात आली. एक वळणावर ही कार कठड्याला धडकून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली.

रात्री उशिरापर्यंत सुरू होते बचावकार्य
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच माणगाव पोलीस पथक तसेच साळुंखे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकादेखील याठिकाणी बोलावण्यात आली. कारमध्ये तिघे मृत झाले होते तर चार तरूण अडकून पडले होते. त्यांना पोलीस तसेच साळुंखे रेस्क्यू टीमने बाहेर काढले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या