22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रपरमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करणा-या क्रिकेट बुकीविरोधात गुन्हा दाखल

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करणा-या क्रिकेट बुकीविरोधात गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करणा-या क्रिकेट बुकी सोनू जलान, केतन तन्ना, जय तन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला बुकी सोनू जालान ऊर्फ सोनू मालाड, केतन तन्ना आणि जय तन्ना यांच्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ५० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.

सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोप असणा-या विकास दाभाडे यांच्या तक्रारीनुसार ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम ३८४, ३८९ आणि १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटकारस्थान करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे सोनू जालान?
सोनू जालान हा मुंबईच्या सट्टा बाजारातील मोठा सट्टेबाज असून त्याचे परदेशातही अनेक ग्राहक आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि सौदी अरेबिया या ठिकाणच्या ग्राहकांशी तो सतत संपर्कात असतो. तर भारतात त्याची मोठी टोळी असून दिल्ली, कोलकाता, राजस्थान, गुजरात, हरियाणा येथून त्याचे पंटर्स सट्टा खेळतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या