25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंसारख्या दिसणा-या विजय मानेंविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्यमंत्री शिंदेंसारख्या दिसणा-या विजय मानेंविरुद्ध गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहूब दिसणा-या विजय मानेंवर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप माने यांच्यावर आहे. तसेच माने यांचे सराईत गुंड शरद मोहोळसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी आता मानेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी विजय माने यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

विजय माने यांची दाढी, मुख्यमंत्र्यांसारखा पोशाख असल्याने ते चर्चेत असायचे. मात्र आता विजय माने यांचे सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा आणि पोषाख करून समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न विजय माने व इतरांनी करून मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून गैरसमज पसरवला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शरद मोहोळ याला ओळखत नाही : विजय माने…
गुन्हा दाखल झालेले विजय माने म्हणाले की, मी शरद मोहोळ याला ओळखत नाही. मला माहीत नसताना माझे नकळत फोटो काढले गेले, कोणत्याही प्रकरणाची शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतिमा मलिन होईल, असे कोणतेही कृत्य मी केलेले नाही आणि करणारही नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या