रेणापूर : प्रतिनिधी
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालातील दारूच्या बाटल्याची हॉटेल चालकास विक्री केल्यााप्रकरणी प्रथमदर्शनी अहवालानुसार. निलंबीत पोलिस कर्मचारी तथा लेखनिक हावालदार याच्याविरुद्ध रेणापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी दि. १४ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या काळात तालुक्यातील खरोळा येथील सुहाना हॉटेलमध्ये चोरून दारू विक्री होत असल्याची माहिती रेणापूर पोलिसांना मिळाली त्यावरून १३ एप्रिल रोजी रेणापूर पोलिस कर्मचाºयाच्या पथकाने सुहाना हॉटेलवर धाड टाकुन ३१२ दारूच्या बाटल्या जप्त करून या प्रकरणी हॉटेलचालक अकबर महेबूब शेख याच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या आपणास रेणापूर ठाण्यातील पोलिस कर्मचा-याने विक्री केल्याची माहिती अकबर शेख यांनी कांही प्रासारमाध्यमांना व सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली.
या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती़ शिवाय संबधित पोलिस कर्मचा-यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे येत होती. या बाबत कांही प्रसामाध्यमात बातम्याही प्रकाशित झाल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र माने या प्रकारणाची व सदर पोलिस कर्मचा-याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात रेणापूरचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता प्राथमिकदृष्टया पोलिस कर्मचाºयावर झालेले आरोप व हॉटेलवर जप्त केलेली दारू ही यापूर्वी पोलिसांनी जप्त केलेल्या ठाण्यातील मुद्यामालातीलच आहे असे निर्दशनास आले. त्यावरून पोलिस निरीक्षक दिवे यांनी या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल वरिष्ठाकडे सादर केला़ या प्रकरणातील पोलिस ठाण्यातील लेखनिख हावलदार गणेश गुणवंत पाटील याला २ मे रोजी निलंबित करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक माने यांनी निर्गमीत केला.
मुद्देमालाच्या नोंदीत फेरफार झाल्याचे निष्पन्न
या बरोबरच २९ सप्टेबर २०१९ ते १ एप्रिल २०२० या कालावधीतील स्वत:च्या ताब्यातील रेकॉर्डवरील दारूच्या ९ बाटल्या व गुन्ह्यातील मुद्देमालात फेरफार केला. तसेच ३ दारूच्या गुन्ह्यातील मुद्देमालाचे स्वत: परस्पर विल्हेवाट लावल्याचे चौकशीत उघडकीस आले तसेच जिल्हाधिकारी यांनी निर्गमीत नियमांचे उल्लंघन करून साथीचा रोग पसरेल असे कृत्य केले. अशा अशयाची फिर्याद पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिल्यावरून तत्कालीन लेखनिख हावलदार पाटील यांच्या विरूध्द गुरनं ३३१ / २० कलम ४०९, १८८, २७० भादवि व साथ रोग अधिनियम १८ ९७ चे कलम ३ नूसार रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माच्चेवाड व पोलिस कर्मचारी आबा मोरे हे करीत आहेत़