26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपचे नेते धैयशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल

भाजपचे नेते धैयशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

अकलूज : भाजपचे नेते धैयशील मोहिते पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकलूज पोलिस ठाण्यात मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतसंस्थाच्या कर्जाची वसुली करताना डोक्याला रिव्हालव्हर लावून मारहाण केल्याची तक्रार त्यांच्यावर दाखल करण्यात आली होती.

त्यावरुन अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धैयशील मोहिते पाटील यांच्यासह तीन जणांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी सध्या धैयशील मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाने सांगोल्याच्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद दिले होते.

एका महिलेसोबतचा थेट बेडरूम मधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशमुखांची मोठी बदनामी झाली. पक्षाचीही बदनामी होत असल्याने श्रीकांत देशमुखांना तातडीने राजीनामा द्यावा लागला.

भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले तात्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, माळशिरसचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे शिवाजी कांबळे आणि मोहोळचे विजयराज डोंगरे यांच्या नावाची चर्चा आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची यापूर्वी चर्चा झाली होती मात्र त्यांची जिल्हाध्यक्ष पदाची संधी हुकली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या