21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रशिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्रातील शिक्षक भरती घोटाळ्यात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकणात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली व एका मुलाचे नाव समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच टीईटी परीक्षा न देता देखील यादीत नावे आली असून यादीत नावे टाकली त्यांच्यावर कारवाई करा असे सत्तारांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहिजे असेही सत्तार यांनी म्हटले आहे. माझ्याकडे काल दुपारी साडे अकरा वाजता यादी आली. त्यानंतर मी स्पष्टीकरण दिले की कोणीतरी खोटी बातमी चालवत असून कोणीतरी आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नाहक बदनामी करणा-यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केले आहे.

कायद्यानुसार त्यामध्ये काही चूक असेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होईल असेही ते म्हणाले. या प्रकरणात माझ्या परिवाराची चूक असेल किंवा मी फायदा घेतला असेल, तर मी गुन्हेगार आहे. मात्र या यादीमध्ये ज्यांनी नावे टाकली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे देखील सत्तार यावेळी म्हणाले.

मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार : दरेकर
टीईटी घोटाळ्याच्या संदर्भात विधानपरिषदेत मी आणि तात्कालीन विरोधीपक्षनेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता. या प्रकरणात या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम्ही त्यावेळी केला होता. पण आता एक विदारक सत्य बाहेर आले असून शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा यामध्ये सामावेश असल्याचे समोर आले आहे असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

शिक्षण क्षेत्राला कलंक
टीईटी घोटाळा हा शिक्षण क्षेत्रातला मोठा कलंक आहे, मात्र अब्दुल सत्तारांनी सुद्धा आव्हान दिले आहे की माझ्या मुलांचा यामध्ये समावेश असेल तर मी कोणत्याही शिक्षेस तयार आहे. त्यामुळे काही काळात सत्य समोर येईल. या टीईटी घोटाळ्याचे खरे सत्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येण्याची गरज असून या निमित्ताने ते बाहेर येईल अशी अपेक्षा भाजपचे नेते प्रविण दरेकरांना व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या