22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमनसे विभाग अध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

मनसे विभाग अध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : नुकत्याच गणपती विसर्जनामध्ये झालेल्या राड्यात लोकप्रतिनिधींनी गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच, मनसेच्या एका ३३ वर्षीय विभाग अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा वि. प. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आरोपीने ४२ वर्षीय महिलेला येणा-या मनपा निवडणुकीत तिकिट मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. तसेच, सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान विविध आमिषे दाखवून विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी वृशांत वडके यांना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी मनसे वरिष्ठांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर पक्षाने वृशांत वडके यांच्यावर कारवाई केली होती. चार दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता.

फेब्रुवारी महिन्यात विविध उपक्रमांत तसेच वेळोवेळी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात केलेल्या कार्याची दखल घेत मनसेच्या मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्षपदी वृशांत वडके यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या